भाजपचा नवा वादा: केरळमध्ये भाजपाची सत्ता आल्यास पेट्रोल ६० रुपये लिटर देणार

भाजपचा नवा वादा: केरळमध्ये भाजपाची सत्ता आल्यास पेट्रोल ६० रुपये लिटर देणार

केरळ : पाच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी आश्वासनाची जणू उधळण केली आहे. त्यात आता केरळमधील भाजपा नेते कुम्मनम राजशेखरन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत मोठी घोषणा केली आहे.

या घोषणेवरून आता केरळमध्ये नव्या चर्चेला उधाण आले आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यास पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून इंधन दराच्या किमती ६० रुपये प्रति लिटरवर आणू, असं आश्वासन त्यांनी दिले आहे.

सध्या राजकीय परिस्थितीनुसार केरळमध्ये भाजपाला निवडणूक जिकंण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच अशा अश्वासनाची उधळण केली जात आहे.मग जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे पेट्रोल ६० रुपये दराने विकण्यात यावे असा टोला आता विरोधकांनी लगावला आहे.

भाजप नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा दावा केला. यासोबत त्यांनी केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटच्या सरकारला सवाल केले. एलडीएफसरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत का आणत नाही?, असा सवाल त्यांनी केला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा राष्ट्रीय मुद्दा आहे. केंद्र सरकार याचा विचार करेल, असंही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: