चॉकलेटचा खप जास्त होण्यासाठी किटकॅट चॉकलेटच्या रॅपरवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो

 

नेस्लेनं किटकॅट चॉकलेने आपल्या प्रॉडक्टचा खप जास्त होण्यासाठी थेट भगवान जन्नानाथाचा फोटो रॅपरवर वापरल्यामुळे सध्या नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सादर वृत्त सोशल मीडियावर समोर आले आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर यावरून वाद सुरू झाला आहे, तर लोक चांगलेच संतापलेले दिसत आहेत. सोशल मीडिया यूझर्सचा पारा चढला आहे आणि म्हणूनच #nestle, #KitKat ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

कंपनीनं चॉकलेटचा खप जास्त प्रमाणात होण्यासाठी रॅपरवर भगवान जगन्नाथाचं चित्र लावलं होतं. हे पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे . यावेळी लोकांनी सांगितलं, की अशा जाहिरातींमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात. अहवालानुसार, कंपनीनं गेल्या वर्षी आपल्या चॉकलेट रॅपरवर भगवान जगन्नाथ, माता सुभद्रा आणि बलभद्र यांचे फोटो वापरले होते. त्यानंतर लोकांनी हे चित्र रॅपरवरून हटवण्याची मागणी केली.

लोक म्हणतात, की चॉकलेट खाल्ल्यानंतर लोक रॅपर डस्टबिन किंवा रस्त्यावर टाकतात. तो देवाचा अपमान होईल. हे प्रकरण तापल्यानंतर कंपनीनंही त्यावर स्पष्टीकरण दिलं. आमचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता आणि नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. या वादानंतर संबंधित रॅपर बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केली असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

Team Global News Marathi: