अदर पूनावाला यांना मोठया लोकांकडून धमक्या; फोनवर धमक्या मिळणे दुर्दैवी – अदर पूनावाला

संपूर्ण जगभरात कोरोना रोखण्यासाठी लस बनवणारी अव्वल कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असून काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती पुनावाला यांनी दिली आहे. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या अनेक पॉवरफुल लोकांचे सतत फोन येत आहेत. त्यात काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे.

तसेच येणाऱ्या या फोन कॉल्सचं स्वरुप कधी कधी धमक्यांचंही असतं. मार्टिन फ्लेचर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सीरमतर्फे लवकरच देशआबाहेर लशीची निर्मिती कऱण्याचे नियोजन असल्याचीही माहिती दिली. अदर पुनावाला हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत.केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ अदर पूनावाला यांना ‘Y’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे सीरम इन्स्टिट्युटमधील शासकीय आणि नियमन कार्याचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून अदर पूनावाला संरक्षण देण्याचे आवाहन केले होते.

Team Global News Marathi: