ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत कसे ते पहा

 

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आत भरले आहेत. फसवणूक होण्यापासून सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी एक सिस्टीम बनवण्यात आली आहे. आणि ही सिस्टीम वापरण्यास अतिशय सोपी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्याविषयी सर्व काही सांगणार आहोत. जर तुम्ही ते पूर्णपणे वाचले तर तुम्ही आयुष्यात कधीच ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही. आणि जरी बळी पडलात तरी तुमचे सर्व पैसे 24 तासांच्या आत तुमच्या खात्यात परत येतील.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल तयार केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx ही लिंक आहे. या वेबसाइटवर एक हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे. तो क्रमांक 155260 आहे, तो नोट करा आणि फोनबुकमध्ये सेव्ह करा.

दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची लोकं या क्रमांकावर सात दिवस कोणत्याही वेळी (दिवस किंवा रात्री) फोन करून आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. उर्वरित सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, त्यातील रहिवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान फोन करून तक्रार करू शकतात.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीला बळी असाल तर तुम्हाला तुमचा फोन उचलून 155260 डायल करावा लागेल. हा नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार लिहावी लागेल. तुमच्या बँकेचे नाव-पत्ता आणि बँकेचे पूर्ण डिटेल्स किंवा ई-वॉलेट (PhonePe, Google Pay, PatTM etc) ज्याद्वारे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर मिळतील.

Team Global News Marathi: