जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद; देशमुखांनी आमदारकी तर राऊतांनी राजकारण सोडण्याचा दिला इशारा

जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद; देशमुखांनी आमदारकी तर राऊतांनी राजकारण सोडण्याचा दिला इशारा

ग्लोबल न्यूज । मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते़ या बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता़ त्यामुळे या बंदला सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला़ सोमवारी सकाळपासून मराठा समाजातील विविध कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे,आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर आसूड ओढ आंदोलन केले. बंदला ही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बार्शीत एक युवकाने टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आमदार राजेंद्र राऊत यांनी राजकारण सोडण्याचा तर सुभाष देशमुखांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा ईशारा दिला.

मराठा समाजाला आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे़ आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद ची हाक दिल्याने या बंद ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून संबंध जिल्ह्यात याचा परिणाम पहायला मिळत आहे.

दरम्यान, या सोलापूर जिल्हा बंद आंदोलनाला सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झाली़ माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून देत आरक्षण स्थगिती निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़ आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका स्पष्ट करत कुर्डूवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला तर या बंदमध्ये फक्त सर्व दवाखाने व्यतिरिक्त सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्याने मोठा प्रतिसाद पहायला मिळाला.

मंगळवेढा-सोलापूर येथील रोडवरील टॉल नाक्यावर छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले.

सांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले करमाळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.यावेळी तहसिलदार, पोलिसांना निवेदन देण्यात आले.टेंभुर्णीत बंद पाळण्यात आला होता. कुसळंब चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या बंदचे ग्रामीण भागात लोण पोहोचले असून ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन सकल मराठा समाज्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कुर्डूवाडी येथे पंराडा चौकात चक्क जाम करीत अंदोलन करण्यात आले तर शहरातील व्यावसायिकांनी बंद ठेवून मराठा समाज्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. 

तर बार्शी तालुक्यातील पानगाव येथे लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती पुष्पहार अर्पण करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरले होते.

कुर्डुवाडी शहरात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.कापड,सराफ,किराणा तसेच लहान व्यापारी स्वयंस्फुर्तीने यात सहभागी झाले होते.त्यामुळे बाजारपेठेसह शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.

परंडा चौक येथे दोन तास रस्ता रोको अंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांना मराठा समाजातील लहान मुलाच्या हस्ते निवेदन दिले गेले.

पंढरपुरात आंदोलनाचे तीव्र पडसाद 

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तात्काळ स्थगिती उठवावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने म आज पंढरपूर शहर व तालुक्यात बंद पाळण्यात आले आहे. व प्रमुख रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. 

पंढरपुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आज पहाटेपासूनच जिल्ह्यातील माढा, निमगाव पाटी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर-पुणे महामार्ग बंद केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नवीपेठेत सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले़ त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पार्क चौकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पुतळा करून त्यावर आसूड ओढले.

यावेळी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या़ जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहासमोर आंदोलन केले.

जिल्ह्यातील आंदोलनावर एक नजऱ…

माढा येथील शिवाजी चौकात आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला.

पंढरपुरात मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

कामती (ता़ मोहोळ) येथील मराठा आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

कोंडी (ता.उत्तर सोलापूर) येथे आंदोलनकर्त्यांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला.

सांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रस्ता रोको आंदोलन केले.

मोहोळ शहरातील मराठा समाजाने आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी पंढरपूर-फलटण-पुणे पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन केले.

कुर्डुवाडीत परंडा चौकात मराठा आरक्षणासाठी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

पिराची कुरोली (ता पंढरपूर) येथे कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून आंदोलन केले.

अरण (ता माढा) येथे व्यापारी, बँक, ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.

कुर्डूवाडीसह परिसरातील गावात १०० टक्के बंद.

अकलूज येथे समाज बांधवांनी चप्पल मारो आंदोलन केले.

पानगांव येथे समाज बांधवांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.

खर्डी (ता पंढरपूर) येथे बंदला १०० टक्के प्रतिसाद.

सांगोला येथील युवकाने रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारचा निषेध केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: