आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना मिळणार कर्ज; वाचा सविस्तर

आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज; वाचा सविस्तर

ग्लोबल न्यूज : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे. यापूर्वी ६ डिसेंबर रोजीच्या शासन नियम पत्रकानुसार मालकी हक्क मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. आता हा आदेश रद्द करण्यात आला असून ग्रामस्थांना घरच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका,पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेता येणार आहे.

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या काहीजण घरावर कर्जाचा बोजा चढवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

यापूर्वी आपल्या कर्जाच्या बोजाची नोंद होत नसल्यामुळे बँका, पतसंस्था यांच्याकडूनही कर्ज नाकारण्यात येत होते. त्यामुळे आता हा शासन आदेश रद्द करुन नमुना ८ वर बँका, पतसंस्था आणि इतर अधिकृत वित्तीय संस्थांना कर्जाचा बोजा चढविण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या संस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: