राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवत इम्रान खान यांची गिलानींना श्रद्धांजली

 

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे काल, बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. हैदरपोरा येथील राहत्या घरी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भारतासोबत पाकिस्तान नेते शोक व्यक्त करत आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलानी यांच्या निधनामुळे देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

तसेच दुखवटा पळत पुन्हा एकदा इम्रान खान याने आपल्या जुन्या सवई नुसार भारतावर निशाणा साधत गिलानी हे पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी पाकिस्तान राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आल्याचे सांगितले आहे. पण इम्रान खान यांचे हे ट्वीट टीकेचा विषय ठरत आहे. सध्या इम्रान खान याच्यावर सर्व स्थरातून टीका होताना दिसत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हणाले की, ‘काश्मिरी स्वातंत्र्य सेनानी सय्यद अली गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दुःख झाले आहे. गिलानी यांनी आपल्या लोकांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास शिकवले. भारताने त्यांना कैद केले होते आणि त्यांच्यावर अत्याचार केला. परंतु त्यांनी हे सर्व सहन केले. आम्ही पाकिस्तानमध्ये त्यांच्या संघर्षाला सलाम करतो.’

Team Global News Marathi: