“माझी तयारी कशी आहे हा येणार काळच सांगेल” – हार्दिक पांड्या

दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला अहमदाबाद फ्रेंचायजीने आयपीएल २०२२ च्या आगामी सीजनसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कुठल्यातरी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान त्याने स्वतःसंदर्भात मोठे विधान केले आहे. अष्टपैलू म्हणून आपण खेळण्यासाठी सज्ज असल्याचे पांड्याने म्हटले आहे.हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याला टीम इंडियासाठी अष्टपैलू म्हणून खेळायचे आहे.

तो म्हणाला, ‘मला अष्टपैलू खेळाडूसारखे खेळायचे आहे. तशी माझी तयारी आहे. काही चुकलं तर मी सांगू शकत नाही. पण आता फिट आहे.माझी तयारी कशी आहे हे येणारा काळच सांगेल. असे सूचक वक्तव्य पांड्याने यावेळी केले. यासोबतच त्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवरही भाष्य केले. त्याने त्याचे कौतुक करत मी त्याच्याकडून खुप काही शिकलो आहे.

त्याने मला खूप फ्रीडम दिला. त्याने मला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. असे सांगत त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाल, मी माझ्या पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये २२ किंवा २४ धावा देण्याचा विचार करत होतो.मला वाटलं की हा माझा पहिला आणि शेवटचा सामना असेल. पण दुसऱ्या ओवरमध्ये माही भाईने मला बोलावले आणि त्यानंतर संपूर्ण चित्रच पालटले.

Team Global News Marathi: