मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पूरी यांच्या भेटीला

 

नवी दिल्ली | मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ‘द मॉडेल टेनेंसी कायदा २०२१’ बद्दल केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पूरी यांचे अभिनंदन करीत आशा व्यक्त केली की, या नवीन कायद्यामुळे मालक व भाडेकरू यांच्यात अधिक समन्वय वाढेल. तसेच लोढा यांनी रिअल इस्टेट दर, व्यावसायिक व निवासी सद्यपरिस्थिती, भाडे व पागडी व्यवस्था इ. विषयांवर चर्चा केली आहे. तसेच विरोधी पक्षांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या अफवा व सद्यस्थितीविषयी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पूरी यांना माहिती दिली.

मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांना दोन प्रमुख मुद्द्यांचे स्पष्टीकरण देणारे परिपत्रक काढण्याची विनंती केली आहे. पहिला मुद्दा असा की, कलम ४ (१) नुसार हा कायदा ‘पूर्वगामी’ नाही. परंतु विरोधक हा कायदा पूर्वगामी असल्याच्या अफवा पसरवत आहे. या विषयी स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे; जेणेकरून अफवा पसरवणाऱ्यांची आपण बोलती बंद करू शकतो.तर दुसरा मुद्दा असा आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रात पागडी व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. आणि भाडेकरू व जमीनदारांच्या पागडी व्यवस्थेवर हा कायदा लागू होत नाही. तसेच या परिपत्रकामुळे घरमालक व जमीनदार यांच्यातील भीतीचे वातावरण संपेल.

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांच्यासह मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, श्री. राहूल नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सकारात्मक आश्वासन दिले की, ‘द मॉडेल टेनेंसी कायदा २०२१’ संदर्भात गैरसमज टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

Team Global News Marathi: