मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने पुण्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साह; जल्लोषाच्या तयारीत

 

कोरोना दोन वर्षांपासून राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंधांखाली साजरा केला जात होता. संपूर्ण जगभरात आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. या गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध दूर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह आला आहे. गणराज विराजमान होण्यासाठी ३९ दिवस बाकी असताना हा निर्णय घेतल्याने गणेश मंडळांना पुढील तयारीसाठी वेळ मिळणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने शहारातील गणेश मंडळांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सायंकाळी ढोल ताशा पथकांचा अधिक उत्साहात सराव सुरू झाला होता. मानाच्या गणेश मंडळांचे या निर्णयाबाबत काय मत आहे, हे प्रसिद्ध माध्यमांनी जाणून घेतले आहे.

अत्यंत स्वागतार्ह निर्णय राज्य सरकारने घेतला आला आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर जे खटले दाखल आहेत, ते मागे घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आजवर अनेकदा असे म्हटले गेले; पण त्यावर ठोस भूमिका कोणीही घेतली नाही. त्यामुळे याबाबतीत कालमर्यादा ठरवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनिक्षेपकांबाबतीत असलेल्या आदेशाचे पालन करूनच आम्ही गणेशोत्सव साजरा करू असे मत कसबा गणेश मंडळचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मांडले आहे.

Team Global News Marathi: