देशात २४ तासात पावणे दोन लाखांहून अधिक करोनाबाधित, मृत्यूंची संख्या १०२७

नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचा आकड्याने तोंडात बोटं घालण्याची वेळ आणलीय. मंगळवारच्या २४ तासांत करोनाबाधित १ लाख ८४ हजार ३७२ रुग्णांची भर पडलीय. तर मृतांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झालेली दिसून येतेय. भारतात मंगळवारी एकाच दिवशी १ हजार ०२७ करोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या वर्षातील एका दिवसाचा हा सर्वात मोठा आकडा ठरलाय.

आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ८२ हजार ३३९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७२ हजार ०८५ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांत संक्रमित रुग्णांची संख्या

१ एप्रिल : ८१ हजार ३९८
२ एप्रिल : ८९ हजार ०२३
३ एप्रिल : ९२ हजार ९९४
४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४
५ एप्रिल : ९६ हजार ५६३
६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२
७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९
९ एप्रिल : १ लाख ४४ हजार ८२९
१० एप्रिल : १ लाख ५२ हजार ८७९
११ एप्रिल : १ लाख ६८ हजार ९१२
१२ एप्रिल : १ लाख ६१ हजार ७३६
१३ एप्रिल : १ लाख ८४ हजार ३७२

गेल्या काही दिवसांतील मृतांची संख्या

१ एप्रिल : ४६८
२ एप्रिल : ७१३
३ एप्रिल : ५१४
४ एप्रिल : ४७७
५ एप्रिल : ४४६
६ एप्रिल : ६३०
७ एप्रिल : ६८५
८ एप्रिल : ८०२
९ एप्रिल : ७७३
१० एप्रिल : ८३९
११ एप्रिल : ९०४
१२ एप्रिल : ८७९
१३ एप्रिल : १०२७

ग्लोबल न्युज नेटवर्क: