मोदी यांच्या मंत्री मंडळाच्या नव्या मंत्र्यांची पार पाडणार बैठक, स्वीकारणार पदभार |

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ३८ नवे चेहरे घेण्यात आले असून आज हे सारे मंत्री पदभार स्वीकारणार आहेत. मोदींच्या अध्यक्षतेखाली या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होणार असून यामध्ये पदभार स्वीकारण्याबरोबरच मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

पण महाराष्ट्रातून संधी देण्या आलेले चारही चेहरे वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये मोदी काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यानंतर सात वाजता मंत्रिपरिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे.

Team Global News Marathi: