पाकिस्तानात गडद काळोख, इस्लामाबाद, कराचीसह अनेक शहरे अंधारात बुडाली

.पाकिस्तानात गडद काळोख, इस्लामाबाद, कराचीसह अनेक शहरे अंधारात बुडाली

पाकिस्तानमध्ये शनिवारी अचानक संपूर्ण शहराची लाइट गेल्यामुळे एकाच गोंधळ निर्माण झाला होता. कराची, इस्लामाबाद, मु्ल्तान आणि रावळपिंडीसह अनेक शहरांमध्ये गडद काळोख पसरला होता. अचानकपणे झालेल्या ब्लॅकआउटमुळे पाकिस्तानमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेकांची झोप उडाली.

मात्र, यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पॉवर ट्रिपींगमुळे ही समस्या उद्भवली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच होणाऱ्या वेगवेगळ्या या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र लाइट गेल्यामुळे शहरांमध्ये एकच धांदल उडाली होती.

पॉवर ट्रान्समिशन यंत्रणेची फ्रीक्वेन्सी अचानकपणे ५० हून शू्न्यावर आल्यामुळे देशव्यापी ब्लॅकआउट झाला असल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली. हा तांत्रिक बिघाड रात्री ११.४१ वाजण्याच्या सुमारास झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: