मणिपूर विधानसभेत शिवसेनेचे आमदार दाखल होणार – राहुल शेवाळे 

 

मुंबई : यंदा पहिल्यांदाच मणिपूर विधानसभेत शिवसेनेचे आमदार दाखल होतील आणि नवा इतिहास घडेल, असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला. मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मणिपूरमधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना खासदार शेवाळे यांनी हा विश्वास व्यक्त केला.

मणिपूरमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, सचिव सूरज चव्हाण यांच्यासह खासदार राहुल शेवाळे मणिपूरमध्ये दखल झाले असून त्यांनी इथल्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये उपस्थिती नोंदवली.

दादरा – नगर हवेली येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील यशानंतर आता शिवसेनेने पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरविले आहेत.

महाराष्ट्राबाहेरच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून चारही राज्यांतील प्रचारासाठी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच बडे नेते त्या त्या राज्यांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे यंदा चारही राज्यात शिवसेना काही प्रमाणात नक्कीच यश संपादन करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Team Global News Marathi: