माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती, पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

 

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात सद्भावना दिवस साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा याच दिवशी जन्म झाला होता. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांना एक दूरदर्शी नेता मानले गेले. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

राजीव गांधींचा जयंतीदिन देशात सद्भावना दिवस आणि राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र राहावे, सर्व धर्माच्या लोकांमध्ये बंधुता आणि सामाजिक ऐक्य, प्रेम आणि आपुलकी जागृत करणे हा सद्भावना दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. काँग्रेसने हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज ट्विटरवरुन राजीव गांधींना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. राजव गांधी यांची आज 78 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने मोदींनी ट्विटवरुन त्यांच्याबद्द्ल आदर व्यक्त केला. दरम्यान, गांधी घराण्यावर टीका करण्याची संधी नरेंद्र मोदी कधीही सोडत नाहीत. 15 ऑगस्टदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करतानाही त्यांनी घराणेशाहीची उल्लेख करत काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टिका केली होती. मात्र, पंतप्रधान म्हणून आज त्यांनी राजीव गांधींच्या जंयंतीदिनी त्यांचा आदर करत आंदरांजलीही वाहिली आहे.

Team Global News Marathi: