भाजपविरुद्ध सर्वांनी एकत्र या! ममता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेत्यांना पत्राद्वारे साद ..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींसह देशातील प्रमुख नेत्यांना लिहिले पत्र

भाजपकडून देशाच्या लोकशाहीवर आणि संविधानावर हल्ला होत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी भाजपला उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी भाजपविरोधात इतर सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि देशातील जनतेसमोर नवा पर्याय ठेवला पाहिजे, असे पत्र तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाठविले आहे.

 

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दुसऱया टप्प्यात आज (दि. 1) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना तीन पानी पत्र पाठवून भाजपकडून सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली आहे. या टप्प्यातील मतदानानंतर भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्याचेही सुचविले आहे.

पत्रातील प्रमुख मुद्दे
भाजपकडून लोकशाहीवर आणि संविधानावर होणाऱया हल्ल्याविरोधात सामूहिकपणे संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
भाजपविरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. देशातील जनतेसमोर नवा विश्वासार्ह पर्याय ठेवला पाहिजे.
भाजपकडून देशात एकपक्षी हुकूमशाही पद्धत राबविण्याची रणनीती आखली जात आहे. त्याविरोधात सामूहिकपणे लढायला हवे.

 

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणूका सुरू असताना तामीळनाडूत द्रमुक नेते आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल नेत्यांवर ‘ईडी’कडून धाडी टाकल्या गेल्या.
मोदी सरकारने घाऊक पद्धतीने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे.

ठळक बातम्या : मुंबईत आजपासून दोन शिफ्टमध्ये लसीकरणबाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनचिपी विमानतळ हवाई वाहतुकीसाठी त्वरित सुरू करा!मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशराजस्थानात तरुणाचा ‘शोले’स्टाईल ड्रामा; जबानीत दिले चक्रावणारे उत्तरहा बॅकलेस ब्लाऊज तू घातलास तरी कसा? सारा अली खानला नेटकऱ्यांचा सवालTips –कडू कारले, पण आश्चर्यचकीत करणारे फायदे!

या गैरभाजप नेत्यांना पत्र

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, बिजू जनता दलाचे अध्यक्ष, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, ‘टीआरएस’चे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, राजद अध्यक्ष तेजस्वी यादव, द्रमुक अध्यक्षा एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक गैरभाजप नेत्यांना पत्राच्या माध्यमातून एकत्र येण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

राज्यपाल हे तर भाजपचे कार्यकर्ते

विरोधीपक्षांच्या ताब्यात असलेल्या राज्यांमध्ये मोदी सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे कारभार करत आहेत. संविधानिक पदाची जबाबदारी हे राज्यपाल पाळत नाहीत, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी पत्रात केला आहे.

ममतांना राष्ट्रवादीचा पाठिंबा ः नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ममता बॅनर्जींचे पत्र आले आहे. शरद पवार 1 ते 3 एप्रिलदरम्यान पश्चिम बंगालला जाणार होते, परंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जाता आले नाही. ममतांना आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. प्रकृतीत सुधारणा झाल्यास शरद पवार हे बंगालमधील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तिकडे जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यांचा निधी जाणूनबुजून दिला जात नाही

केंद्रातील मोदी सरकारकडून विरोधी पक्षांच्या ताब्यातील राज्यांचा हक्काचा निधी जाणूनबुजून दिला जात नाही. त्यामुळे अनेक विकासकामांची आणि सामाजिक सुधारणा करणाऱया योजनांची अंमलबजावणी करताना या राज्यांना अडचणी येत आहेत. याकडेही ममता बॅनर्जी यांनी लक्ष वेधले. नियोजन आयोगाच्या जागी आणलेला निती आयोग हा टूथलेस थिंक टँक आहे, अशी टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त करणे पिंवा पाडणे एवढेच भाजपकडून सुरू आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: