लग्नाचं अमिश दाखवून सोनिया गांधींच्या ७१ वर्षीय स्वीय सचिवावर गुन्हा दाखल

 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवाविरुद्ध एका महिलेवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ७१ वर्षीय पीपी माधवन असं आरोपीचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. डीसीपी (द्वारका) हर्षवर्धन म्हणाले, “71 वर्षीय व्यक्तीवर आरोप लावण्यात आलेले आहेत. ते एका ज्येष्ठ राजकीय नेत्याकडे पीएस म्हणून कार्यरत आहेत. २५ जून रोजी तक्रार प्राप्त झाली. विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने माधवनवर नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार आणि छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. महिलेने सांगितलं की २०२० मध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान तिचा नवरा गमावल्यानंतर काहीच काळात ती आरोपीला भेटली. तिचा नवरा पक्ष कार्यालयात मदतनीस म्हणून काम करायचा.

नोकरीच्या शोधात ती अनेकदा काँग्रेस कार्यालयात जात असे. “माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि मी काँग्रेसच्या कार्यालयात गेले, जिथे मला सोनिया गांधींचे पीए पीपी माधवन यांचा नंबर मिळाला. मी त्यांना सांगितलं की मला नोकरीची गरज आहे आणि त्याने मला मदत करण्याचं वचन दिलं. २१ जानेवारीला त्यांने मला मुलाखतीसाठी बोलावलं. त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले आणि माझी सर्व कागदपत्रं पाहिली. नंतर मला सांगितलं की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. मी हो म्हणाले.

तसेच एके दिवशी त्याने मला भेटायला बोलावलं. तो मला गाडीत घ्यायला आला. त्याने त्याच्या ड्रायव्हरला गाडीतून बाहेर जायला सांगितलं आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी यावर आक्षेप घेतला तेव्हा तो रागावला आणि मला रस्त्यावर एकटीला सोडून गेला,” असा महिलेचा आरोप आहे. फिर्यादीने आरोप केला की आरोपीनी नंतर तिची माफी मागितली आणि ते पुन्हा बोलू लागले. काही दिवसांनी त्याने तिला पुन्हा भेटायला बोलावलं आणि माझ्यावर बलात्कार केला.

Team Global News Marathi: