कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत उपचार सुरू

महान क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले.

कपिल देव यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. देव यांना हृदयविकाराचा हलका झटका आला असून चिंतेचे काहीही कारण नाही, असे त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. अतुल माथुर यांनी सांगितले. अष्टपैलू खेळाडू म्हणून कपिल देव यांनी कारकीर्द गाजवली. त्यानंतर त्यांनी समालोचकाचे काम केले होते. 1983 साली त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट विंडीजला हरवत वर्ल्ड कप जिंकला होता. 131 कसोटी सामने खेळणाऱ्या कपिल देव यांनी 400 गडी बाद केले आहेतच. पण चार हजारपेक्षा जास्त धावाही केलेल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: