कन्हैयालाल हत्येवर फेसबुक पोस्ट करणाऱ्या मुंबईतील तरुणीला धमकी

मुंबई – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लालच्या हत्याबाबत फेसबुक पोस्ट केल्याने मुंबईतील गोरेगाव येथील 16 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणीने या संदर्भात व्हीपी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीने तिच्या फेसबुक वॉलवर कन्हैया लालच्या हत्येबाबत काही मत व्यक्त केली होती. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिला व्हॉट्सअॅप कॉल केला आणि पोस्टमध्ये केलेल्या मत व्यक्त केल्याबद्दल तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नुपूर शर्माचे समर्थन करणारा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे 28 जून रोजी राजस्थानमधील उदयपूर शहरातील त्याच्या दुकानात कन्हैया लालची हत्या करण्यात आली होती.

 

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना भाजपने निलंबित केले आहे. त्याआधी 21 जून रोजी महाराष्ट्रातील अमरावती शहरात औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची याच कारणावरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एएनआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: