इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात, महिलेला 9 लाखांचा गंडा

ग्लोबल न्यूज – इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून सायबर चोरट्याने महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट, परदेशी चलन पाठविल्याची बतावणी करून तब्बल 9 लाखांचा गंडा घातला. लोहगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्ती सोबत झालेली मैत्री महागात पडू शकते. याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आले आहेत. परंतु एक जण अद्यापही सोशल मीडियावरील मैत्रीबाबत म्हणावे इतके जागरूक दिसत नाहीत.

इस्टाग्रामवरून झालेल्या मैत्रीनंतर महिलेची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. सायबर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावे, डाव्या पक्षांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत कामाला आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. सायबर चोरट्याने महिलेशी गोड बोलून विश्वास संपादन केला.

त्यानंतर तिला परदेशातून महागडे गिफ्ट, परदेशी चलनातील रोकड पाठविली असल्याचे सांगितले. मात्र, पाठविलेले गिफ्ट व रोकड कस्टम विभागाने अडवून ठेवल्याचे त्याने महिलेला सांगितले.

चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही

गिफ्ट सोडविण्यासाठी पैसे भरण्यास सांगून सायबर चोरट्याने महिलेला 9 लाख रुपये बँक खात्यात भरायला भाग पाडले. रक्कम जमा केल्यानंतरही गिफ्ट मिळत नसल्यामुळे महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना बसणार झटका; 6 डिसेंबरपासून योजना 40 टक्यांनी महागणार

ग्लोबल न्युज नेटवर्क: