नुपूर शर्मा, जिंदाल, ओवेसी यांच्याविरुद्ध FIR; दिल्ली पोलिसांची कारवाई

 

दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल, AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, वादग्रस्त पुजारी यती नरसिंहानंद आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर वादग्रस्त विधानं करून सार्वजनिक शांतता भंग करणे आणि लोकांना चिथवण्याचा आरोप केल्याप्रकरणी FIR नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी आज ही माहिती दिली.

सोशल मीडियावर विधानांचं विश्लेषण केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘समाजात फूट पाडणारी आणि सार्वजनिक शांतता भंग करणारी विधानं-माहिती पोस्ट आणि शेअर करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कलम 153 (दंगल घडविण्याच्या हेतूने उत्तेजितपणे चिथावणी देणे), 295 (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने प्रार्थनास्थळाला दुखापत करणे किंवा अपवित्र करणे), 505 (सार्वजनिक दंगल घडवून आणणारी विधाने) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एक केस शर्मा विरुद्ध आणि दुसरा गुन्हा अनेक सोशल मीडिया संस्थांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे, ज्यात ओवेसी, जिंदाल, नरसिंहानंद, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान आणि गुलजार अन्सारी यांचा समावेश आहे, असे अधिकारी म्हणाले.

Team Global News Marathi: