जखमी मोहम्म्द सिराजने वेदना होत असतानाही पुर्ण केली ओव्हर, जिंकली सर्वांची मनं

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी टी20 मालिकेतील पहिला सामना झाला. टीम इंडियानं हा सामना ५ विकेट्स आणि २ बॉल राखून जिंकला. टीम इंडियाच्या या विजयासोबत क्रिकेट जगतात मोहम्मद सिराजचे कौतुक होत आहे. बॉलिंग दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हाताला जोराचा चेंडू लागला पण, सिराजच्या ने दुर्लक्ष करत आपले लक्ष खेळाकडे केंद्रित केले. त्याच्या याच भूमिकेवर सध्या सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडिया जेव्हा गोलंदाजी करत होती तेव्हा मोहम्मद सिराजकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

२० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या हाताला दुखापत झाली. मिचेल सँटनरने खेळलेला शॉट थेट सिराजच्या हातावर आदळला. त्यानंतर प्राथमिक उपचार घेत सिराजनं ते षटक पूर्ण केलं आणि अवघ्या पाच धावा देत एक विकेटही घेतली. त्याच्या याच खेळीने त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

२० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद सिराजने रचिन रवींद्रला बोल्ड केले. खरतर मोहम्मद सिराज या षटकात महागडा खेळाडू ठरला. त्याने ४ षटकांत ३९ धावा दिल्या. मोहम्मद सिराजने अशाप्रकारे क्रिकेट चाहत्यांची मने जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑस्ट्रेलियाचा दौरा असो की इंग्लंडचा दौरा, मोहम्मद सिराज सातत्याने संघासाठी चांगला खेळ दाखवत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले, मात्र ते संघासोबतच राहिला होता.

Team Global News Marathi: