सोन्या सोबत चांदीच्या दरात मोठी वाढ ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : कमॉडिटी आणि सराफा बाजारात तेजी कायम आहे. आज बुधवारी कमॉडिटी बाजारात सोने १६० रुपयांनी महागले. मंगळवारी सोन्याचा भाव १३० रुपयांनी वधारला होता. बाजारात तेजी असल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९२०१ रुपये आहे. त्यात १६३ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४९२१५ रुपयांपर्यंत वाढला होता. मागील पाच महिन्यातील एमसीएक्सवरील सोन्याचा उच्चांकी स्तर आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव ६६६४५ रुपये आहे. त्यात ४११ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने आज ६६३७४ रुपयांचा स्तर गाठला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४७० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४९४७० रुपये आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५२४२० रुपये आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत २५० रुपयांची घसरण झाली आहे.

आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६२५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०४५० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८७५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१४५० रुपये इतका आहे. जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १८५४.३९ डॉलर प्रती औंस इतका खाली आला. त्यात मंगळवारच्या तुलनेत ०.२ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २४.९५ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.६ टक्के वाढ झाली.

सोन्याच्या किमतीत हळूहळू सावरत आहेत. नजीकच्या काळात सोनं १८४५ डॉलर ते १८७० डॉलरच्या दरम्यान राहतील, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमॉडिटी विश्लेषक तपन पटेल यांनी व्यक्त केले. एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४८९०० ते ४९४०० रुपयांच्या दरम्यान राहील, असे त्यांनी सांगितले.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: