इंदौरहून अमळनेरकडे येणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली; एकूण १३ प्रवाशांचा मृत्यू

 

मध्यप्रदेश | मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस इंदौरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले असून १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची एसटी बस आहे. खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने एसटी बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली.

या घटनेनंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. अॅम्बुलन्सद्वारे धामनोद सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे. 30 ते 35 प्रवासी बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला. घटनास्थळी पोलीस आणि गोताखोर प्रवाशांचा शोध घेत आहेत.एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळी पोहोचलेली आहे.

या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते असे सांगतिले जात आहे. यापैकी महाराष्ट्रातील किती याची आकडेवारी मिळू शकलेली नाही. सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली. एम.एच. -४० – ९८४८ असा या बसचा क्रमांक आहे. बसचालक सी.ई. पाटील व वाहक पी.एस. पाटील यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती अमळनेर आगार प्रमुखांनी दिली आहे.

Team Global News Marathi: