पी एम केअर फंडाच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा, काँग्रेसने पाठवली नोटीस

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दानशूर व्यक्तींनी पीएम केअर फंडामध्ये सढळ हाताने मदत केली होती. मात्र दुसरीकडं पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो असल्याकारणामुळे काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यातच पी एम केअर फंडच्या संकेतस्थळावरून नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यासाठी सरकारला थेट नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठाण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते विक्रांत चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पीएम केअर फंडच्या अधिकृत संकेतस्थळावरून पंतप्रधान मोदींचा फोटो, त्यांचं नाव, राष्ट्रध्वज आणि सोबतच देशाचे बोधचिन्ह हटवण्याची देखील मागणी केली आहे. विक्रांत चव्हाण यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

पीएम केअर फंड पूर्णपणे स्वतंत्र आहे. यात कोणतंही सरकारी काम केलं जात नाही. न्यासाचा निधी हा केंद्र सरकारच्या मालकीचा नाही. न्यासाकडे गोळा होणारा निधी हा देशाच्या एकत्रित निधीत जात नाही. त्यामुळे या स्थितीत न्यासाच्या नावात पंतप्रधान शब्दाचा वापर चुकीचा असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: