उत्तरप्रदेशात भाजपनं रिपाइंसोबत लढाई, रामदास आठवले यांची मागणी !

 

मुंबई | येणाऱ्या काही महिन्यात उत्तर प्र्रदेश विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपला सत्तेतेतून खाली उतरवण्यासाठी सर्व विरोधकांनी कंबर कसली आहे. तर भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या पक्षांनी सुद्धा एकत्र निवडणूक लढण्याचे भाष्य केले आहे. त्यातच आता रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावर भाष्य केले आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका भाजपने आरपीआयसोबत युती करून लढायला हव्या, असे म्हटले आहे. रामदास आठवले यांनी रॅलीची घोषणा केली आहे. २६ सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार असून, जवळपास ७५ जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे ते म्हणाले. आरपीआय (आठवले) २६ सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार आहे. ७५ जिल्ह्यांमध्ये ही रॅली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

भाजपाने आरपीआयशी युती करून आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून, भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: