जमिनीवर बसून जेवणाऱ्या मीराबाई चानूच्या फोटोवर आर. माधवनची प्रतिक्रिया !

 

ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकून संपूर्ण देशाची मन उंचवणाऱ्या मीराबाई चानू हिच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र मीराबाई चानू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सध्या तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती जमिनीवर बसून जेवण करताना दिसत आहे.

तसेच अभिनेता आर. माधवन यानेदेखील हा फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ”यावर माझा विश्वास बसत नाहीये, मी निःशब्द झालोय,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मीराबाई किचनमध्ये जमिनीवर बसून जेवताना दिसतेय.

आज देशाची मान अभिमानाने उंचवणाऱ्या मीराबाईचे खरे आयुष्य या फोटोमुळे सर्वांसमोर आले आहे. ”ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू मणिपूर येथील तिच्या घरी जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. मीराबाई यांना या गरिबीने त्यांचे स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही,” अशी कॅप्शन या व्यक्तीने दिली होती. हा फोटो आर. माधवन याने रिट्विट केला आहे.

Team Global News Marathi: