पुढील 15 वर्षांत हिंदुस्थान पुन्हा अखंड हिंदुस्थान होईल – सरसंघचालक मोहन भागवत

पुढील 15 वर्षांत हिंदुस्थान पुन्हा अखंड हिंदुस्थान होईल – सरसंघचालक मोहन भागवत

 

येत्या 15 वर्षांत हिंदुस्थान पुन्हा अखंड हिंदुस्थान होईल आणि ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कनखल येथील संन्यास रोड परिसरातील श्रीकृष्ण निवास येथे ते बोलत होते.

कनखल येथे पूर्णानंद आश्रम येथील ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी भागवत आले होते. तेव्हा उपस्थितांना संबोधित करताना भागवत म्हणाले की, सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. येत्या 15 वर्षांत हिंदुस्थान पुन्हा अखंड हिंदुस्थान होईल आणि ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू. संत आणि ज्योतिषांनी वर्तवलेल्या भाकितानुसार, येत्या 20 ते 25 वर्षांत हिंदुस्थान पुन्हा अखंड होईल, असं भागवत यावेळी म्हणाले.

हिंदुस्थान सातत्याने प्रगतीपथावर आहे. त्याच्या वाटेत जो येईल तो नष्ट होईल. आम्ही अहिंसेची भाषा हातात शस्त्र धरून करू. आमच्या मनात कोणताही द्वेष किंवा शत्रुत्व नाही, पण हे जग ताकदीसमोरच झुकत असेल तर आम्ही काय करू शकतो? जे लोक सनातन धर्माचा विरोध करतात, त्यांचाही यात वाटा आहे. कारण, त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू जागा झाला नसता, असंही भागवत यावेळी म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: