एम्सच्या अहवालात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत खुलासा ; वाचा सविस्तर-

एम्सच्या अहवालात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एम्सने आपला अहवाल सीबीआयला दिला आहे. या अहवालाच्या आधारे आता सीबीआय आपला तपास करेल.

एम्सच्या अहवालात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर झाला खुलासा, विषप्रयोग झाल्याचा दुजोरा नाही

नवी दिल्ली: सुशांत सिंह राजपूत  प्रकरणी एम्सने  आपला अहवाल  सीबीआयला  सुपूर्द केला आहे. एम्सच्या अहवालात म्हटले गेले आहे की सुशांत सिंह राजपूतच्या ज्या विसेराची तपासणी पथकाने केली आहे त्यात विषाचे अंश मिळालेले नाहीत. पण अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ज्या खोलीत सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन  करण्यात आले तिथे प्रकाश फारच कमी होता.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता आणि त्याचे शवविच्छेदन त्याच दिवशी मुंबईतील कूपर रुग्णालयात झाला होता. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर एम्सच्या डॉक्टरांच्या एका पथकाला या अहवालाची तपासणी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. काल संध्याकाळी एम्सकडून हा अहवाल सीबीआयला देण्यात आला. एम्सच्या या अहवालात विषप्रयोगाची शक्यता नाकारण्यात आली आहे, पण हत्येच्या संशयाला मात्र नकार देण्यात आलेला नाही. असे मानले जात आहे की सीबीआय आता या अहवालाच्या आधारावर आपला तपास करणार आहे.

याआधी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी शुक्रवारी आरोप करत म्हटले होते की सीबीआयच्या तपासाची गती अचानक संथ झाली आहे आणि पूर्ण लक्ष अंमली पदार्थांशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित झाले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘आज आम्ही असहाय्य आहोत कारण हे प्रकरण कोणत्या दिशेने जात आहे हे आम्हाला ठाऊक नाही. सामान्यतः सीबीआयद्वारे पत्रकार परिषद घेतली जाते. पण याप्रकरणी मात्र सीबीआयने आत्तापर्यंत एकदाही पत्रकारांशी संवाद साधलेला नाही की त्यांच्या हाती काय काय लागलेले आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: