मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत – पी चिदंबरम

 

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजलेला असताना दुसरीकडे इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. आज कोरोना संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना दुसरीकडे इंधनदर वाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. याच मुद्दयावरून विरोधकांनी सुद्धा मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

त्यात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये देशातील पहिल्या एलएनजी पंपाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक विरोध करत आहेत. यामुळे आता आपण पर्यायी इंधनांकडे वळण्याची गरज निर्माण झाल्याचे गडकरींनी सांगितले.
या वाढत्या इंधन दरावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारमध्ये फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत आहे” असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात स्वीकार केलं होतं. त्यावर चिदंबरम यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्र सरकारमधील सर्व निर्णय हे पंतप्रधान मोदी घेतात हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. यामुळे कोण अर्थमंत्री आहे आणि कोण नाही, याला काही अर्थ उरत नाही.

पंतप्रधान स्वतः अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि क्रीडामंत्री आहेत. तेच सर्वेसर्वा आहेत. पण केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्येच हिंमत आहे. ते वेळोवेळी आपला आवाज उठवत असतात. पण सध्या तेही गप्प आहेत. त्यांनी आपला आवज उठवला पाहिजे. त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद केला पाहिजे” असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: