आज मध्यरात्री पासून फास्ट टॅग नसेल तर भरा दुप्पट टोल

आज मध्यरात्री पासून फास्ट टॅग नसेल तर भरा दुप्पट टोल

ग्लोबल न्यूज:केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. आज पासून फास्ट टॅग अनिवार्य झालेली आहे. फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.

याआधी १ जानेवारीपासून फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते मात्र सरकारने याची मुदत वाढवून १५ फेब्रुवारी केली होती. त्यामुळे आता इथून पुढे देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम FASTag आवश्यक असेल. नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फास्ट टॅग जरुरी आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ यामुळे आता वाचणार आहे.

एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे ७५ ते ८० टक्के आहे जो सरकारला १०० टक्के करायचा आहे. यामुळे सरकार १५ फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.

*तर दुप्पट टॅक्स भरावा लागेल*

जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: