बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत; मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे : मान्सून आगमनाचे संकेत मिळत असताना अंदमानच्या उत्तर भागात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक नसली तरी ते बंगालच्या उपसागरावरून ते ओडिशाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण बनत आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा व पूर्व किनारपट्टीवर वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून शनिवारी (ता.२२) मार्गक्रमण करणार आहे. अतितीव्र चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर अधिक प्रमाणात होणार नसला, तरी टप्याटप्याने मान्सून पुढे चाल करेल, असा अंदाज आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव चार ते पाच दिवस राहणार आहे. त्यानंतर वादळाचा प्रभाव कमी होणार आहे. यामुळे अंदमान व निकोबार बेटांजवळ शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस पडेल.

 

वाचा: विदर्भात पारा घसरला; हवामान खात्याची माहिती
तसेच हे चक्रीवादळ शुक्रवारपर्यंत (ता.२६) ओडिशा, पश्‍चिम बंगाल, बांगलादेशाच्या दिशेने जाणार आहे. या वादळाचा सुरुवातीचा ताशी वेग ४० ते ५० किलोमीटर असून, त्यात हळूहळू वाढ होत जाऊन ताशी ६५-७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे मासेमारीसाठी मत्स्य व्यावसायिकांनी समुद्रात न जाण्याचा असा इशारा देण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: