इतिहास साक्षी आहे, भारताने एकदा ठरवलं ते करतोच- पंतप्रधान नरेंद मोदी ; वाचा लाल किल्ल्यावरील सविस्तर भाषण

इतिहास साक्षी आहे, भारताने एकदा ठरवलं ते करतोच- पंतप्रधान नरेंद मोदी

आज भारत आपला ७४वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. या ऐतिहासिकप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशवासियांना संबोधित केलं. यंदा कोरोना व्हायरसमुळे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

भारत आज आपला ७४वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तिरंगा फडकावून देशवासियांना संबोधित केलं. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवला. कोरोना संक्रमणादरम्यान हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. मात्र यावेळी योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षा छावणीत रुपांतरित झालं आहे. पाहा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे सगळे अपडेट:

आत्मनिर्भर भारतासाठी समतोल विकास आवश्यक आहे
आम्ही ११० पेक्षा अधिक जिल्हे निश्चित केले आहेत, या जिल्ह्यांचा प्राधान्याने विकास करुन त्यांना देशाच्या मुख्य विकासप्रवाहात आणायचे आहे.

जल जीवन मिशनला एक वर्ष पूर्ण

आज जल जीवन मिशनला एक वर्ष पूर्ण होत आहे, आता दरदिवशी एक लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त घरांना नळाने पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या एका वर्षात दोन कोटी घरांना नळाने पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

उत्पादकता वाढण्यासही मदत होईल

आपल्या कामगारांना शहरात परवडणारे निवारे उपलब्ध होतील, यासाठी आम्ही एक मोठी योजना आणली आहे, जेणेकरुन त्यांना त्यांच्या कामाकडे पूर्णत: लक्ष देता येईल, यामुळे त्यांची उत्पादकता वाढण्यासही मदत होईल.

गेल्या सहा वर्षात विविध उपक्रम, योजना राबवल्या!
गेल्या सहा वर्षात प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम, योजना राबवल्या गेल्या. कोविड-१९ च्या काळात या योजनांचा आपल्याला मोठा उपयोग झाला.

‘याची’ कल्पना काही वर्षांपूर्वी कोणीही केली नसती
८० कोटींपेक्षा जास्त भारतीयांना मोफत अन्नधान्य मिळाले, गरजू लोकांच्या बँक खात्यात ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली, ज्याची कल्पना काही वर्षांपूर्वी कोणीही केली नसती.

आपण आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरू करत आहोत
दररोज, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू होत आहे. जे वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन क्रांती आणेल. प्रत्येक भारतीयाला एक नवीन आरोग्य आयडी देण्यात येईल. आपले आरोग्य, अहवालाची माहिती या आरोग्य आयडीमध्ये समाविष्ट केली जाईल. या आरोग्य अभियानातून सर्व प्रकारच्या समस्यांवर मात केली जाईल.

कोरोना लसीबद्दल प्रत्येक माणसाचा मनात प्रश्न आहे की याची लस कधी येणार. मी असे म्हणू इच्छितो की, आपले देशातील शास्त्रज्ञ यासाठी परिश्रम घेत आहेत आणि कठोर परिश्रम घेत आहेत. एक, दोन नव्हे तर तीन-तीन लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. वेगवान उत्पादनामुळे प्रत्येक भारतीयांपर्यंत लस कशी पोहोचेल हे देखील पाहत आहोत.

ही वेळ व्होकल फॉर लोकल होण्याची
ही वेळ व्होकल फॉर लोकल होण्याची आहे. आपल्याला आपल्या देशी उत्पादनांचा अभिमान वाटायला हवा. कोविड-१९ मधून भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर बाहेर काढणे ही आपली प्राथमिकता आहे. यामध्ये नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल, यासाठी ११० लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

आपल्यावर जगाचा विश्वास वाढला आहे
आता मेक इन इंडियासह, आपल्याला मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन वाटचाल करायची आहे. संपूर्ण जग भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासाकडे पाहत आहे. गेल्या वर्षी थेट परकीय गुंतवणुकीत १८ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. आपली अर्थव्यवस्था आणि लोकशाही बळकट करण्यामुळे आपल्यावर जगाचा विश्वास वाढला आहे

लाखो आव्हाने समोर आहेत याची मला कल्पना आहे
आत्मनिर्भरचे उद्दिष्ट साध्य करताना लाखो आव्हाने समोर आहेत याची मला कल्पना आहे, पण आपल्याकडे आव्हानांना तोंड देण्यासाठी तोडगे उपलब्ध करणारे कोट्यवधी नागरिकही आहेत. आपण कोविड-१९ च्या आव्हानाला कशा प्रकारे तोंड दिले त्याचे उदाहरण आपल्यासमोर आहे

फक्त आयातीला पर्याय निर्माण करणे म्हणजे आत्मनिर्भर भारत नव्हे!
आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयातीला पर्याय निर्माण करणे नाही, तर त्याचा अर्थ कौशल्यांचा विकास करणे आणि आपल्या सृजनशक्तीला प्रोत्साहन देणे हा आहे.

अंतराळ क्षेत्र खुले केले
आपण अंतराळ क्षेत्र खुले केले आहे, त्यातून युवकांना संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामुळे बराच फायदा होईल.

कृषी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे!
भारत सध्या केवळ आपल्या गरजेपुरतेच अन्नधान्य पिकवत नसून, ज्यांना गरज असेल त्यांना देखील अन्नाचा पुरवठा करू शकेल अशा स्थितीत आहे. कृषी क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर उद्दिष्ट साध्य केले आहे. आपल्याला मूल्यवर्धनाची आणि आपल्या कृषी क्षेत्रात आणखी परिवर्तनाची गरज आहे.

मानवता केंद्रस्थानी असलीच पाहिजे
संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही अशी नेहमीच भारताची धारणा राहिली आहे. ज्यावेळी आपण आर्थिक वृद्धी आणि विकास यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यावेळी आपल्या या प्रवासात मानवता केंद्रस्थानी असलीच पाहिजे.

भारताने एकदा जे ठरवलं ते करतोच!
जगामध्ये भारताचे योगदान वाढणे ही काळाची गरज आहे, यासाठी भारत आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. याशिवाय इतिहास साक्षी आहे की, भारताने एकदा जी गोष्ट ठरवली ती गोष्ट भारत करतोच

आपण ‘हे’ स्वप्न निश्चितच पूर्ण करु!
भारतासाठी स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य असून आपण निश्चितच हे स्वप्न पूर्ण करु. मला आपल्या देशातील गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या नागरिकांवर, युवकांवर आणि महिलांवर विश्वास आहे. भारताच्या दृष्टीकोनावर माझा विश्वास आहे.

आत्मनिर्भर भारत बनविण्याचा संकल्प
कोविड-१९ च्या आपत्तीच्या काळात भारताने आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला. हे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. आत्मनिर्भर भारत हा १३० कोटी भारतीयांचा एक मंत्र बनला आहे. – पंतप्रधान

आज आपल्याला एक वेगळा संकल्प करण्याची गरज
आपला देश आता स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात प्रवेश करत आहे. अशावेळी आपल्याला एक मोठा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. – पंतप्रधान

आपण कोविड-१९ विरुद्धची लढाई नक्की जिंकू
आपण कोविड-१९ विरुद्धची लढाई नक्की जिंकू, १३० कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण हा विजय मिळवू असा मला विश्वास आहे- पंतप्रधान

पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाच्या सुरुवातीला देशवासीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: