देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान, पंतप्रधान मोदींचा सायरा बानोंना फोन

 

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज साक्ली रुग्णालयात निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

तसेच सर्वसामान्य चाहतेही आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर, दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आता त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या पत्नी सायरा बानो यांना फोन करून विचारपूस केली आहे.

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. चाहत्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या पत्नी सायरा बानो यांना फोन करून धीर दिला आहे.

 

Team Global News Marathi: