हाथरस सामूहिक बलात्कार; राहुल, प्रियांका ‘युपी’ पोलिसांच्या ताब्यात,काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

हाथरस सामूहिक बलात्कार; राहुल, प्रियांका ‘युपी’ पोलिसांच्या ताब्यात,काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

ग्लोबल न्यूज : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

याबाबतचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.

दरम्यान, या कारवाईचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

तर ‘ बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: