उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना निंदनीय वागणूक दिली – शरद पवार

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना निंदनीय वागणूक दिली – शरद पवार

हाथरस येथे एका दलित मुलीवर तेथील सवर्ण जातीच्या युवकांनी केलेल्या बलात्कारप्रकरणी देशाचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच तिच्यावर अत्याचार करून ताजी जीभ चैतन्यात आली तसेच तिची मान मोडण्यात आली या घडलेल्या प्रकारावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले असताना तेथील प्रशासनाने त्यांची अडवणूक करून त्यांना धक्काबुक्की केलेली आहे तसेच त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला होता. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच खासदार शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे.

या घडलेल्या प्रकारावर ट्विट करताना पवार यांनी म्हंटले आहे की, ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना दिलेली गलथान वागणूक ही अतिशय निंदनीय आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशा प्रकारे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणे हे निंदनीय आहे’ असे ट्विट करून पवारांनी सदर घटनेचा निषेध केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: