घडलेला प्रकार हा निश्चितच जाणीवपूर्वक करण्यात आलेला नाही – विनायक राऊत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यात आता राज्यपालांचा विमान प्रवासाला ठाकरे सरकारने हिरवा कंदील न दाखवल्यामुळे त्यांना बसलेल्या विमानातून खाली उतरण्याची वेळ आली होती यावर विऱोधकांनी जोरदार टीका ठाकरे सरकारवर केली होती.यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे.

राऊत म्हणाले की, राज्यपालांच्या प्रवासाकरिता परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रवास नाकारण्यात आला असावा. घडलेला प्रकार हा निश्चितच जाणीवपूर्वक करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. जे विमान आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शासकीय नियमानुसार वापरता येते.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यपालांना ते विमान वापरण्यास देण्याची कोणतीही सक्ती नाही. राज्यपाल यांच्याविषयी कोणतीही कटुता मनामध्ये ठेवून हा प्रवास जाणीवपूर्वक नाकारण्यात आलेला नाही, असंही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय. आम्ही महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांचा नेहमीच आदर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांचा आदर केला आहे. त्यांचा अवमान कदापिही होणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले.

Team Global News Marathi: