गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येण्याअगोरच राष्ट्रीय पक्ष असल्याचा आपने केला पोस्टरबाजीतून दावा

 

गुजरातम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष विरोधात आम आदमी पक्षाने तगडे आवाहन दिले आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले आहे. बुधवार, 7 डिसेंबर रोजी झालेल्या एमसीडी निवडणुकीच्या निकालानंतर ‘आप’ने दिल्लीत पोस्टर्स लावले आहेत. सदर पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पोस्टवर “आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष झाल्याबद्दल सर्व देशवासियांचे अभिनंदन.” असं लिहिले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी तीन मुख्य अटींपैकी एक पूर्ण करणे आवश्यक आहे. लोकसभेच्या चार जागांव्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाला लोकसभेत 6 टक्के मते मिळाली पाहिजेत. किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये 6 टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाली पाहिजेत.

आप दिल्ली आणि पंजाबमध्ये बहुमताने सरकार चालवत आहे. गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ राष्ट्रीय पक्ष होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्याचे अनेक फायदे आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर त्या पक्षाला आरक्षित निवडणूक चिन्ह मिळते. अशा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून काही विशेष अधिकार आणि सुविधा मिळतात.

निवडणुकीच्या काही काळापूर्वी या पक्षांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारणासाठीही वेळ दिला जातो. त्यांचा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते याचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढते. राष्ट्रीय माध्यमांवर विनामूल्य एअरटाइम देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पक्षाचा आवाका वाढवणे सोपे जाते.तर आता आज गुजरातच्या निकालावरुन आप राष्ट्रीय पक्ष होणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Team Global News Marathi: