शेतकरी आंदोलन सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवे – शरद पवार

शेतकरी आंदोलन सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवे – शरद पवार

कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या एक महिन्यांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. त्यात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु होत असून सुद्धा अद्याप तोडगा निघालेला नाही. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवारांनी भाषा केले आहे.

शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवे अन्यथा सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी ते चांगले नसेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.

शरद पवार म्हणाले की, “मला वाटते सरकारने संपूर्ण आंदोलनं अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकलंय की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगले नाही असे पवारांनी भीती व्यक्त केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: