सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ; चांदीचे दर घसरले, जाणून घ्या कसे आहेत भाव

सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ; चांदीचे दर घसरले, जाणून घ्या कसे आहेत भाव

बुधवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 23 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रति औंस 1,812 डॉलर होता. चांदीचा भाव प्रति औंस 26.02 डॉलरवर स्थिर झाला.

नवी दिल्ली : बुधवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 23 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,024 रुपयांवर पोचली. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47,001 रुपये होता. सिक्युरिटीजनुसार चांदीच्या भावातही प्रति किलो 399 रुपयांची घसरण दिसून आली. चांदीचा दर 67,663 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला. मागील सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 68,062 रुपये होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रति औंस 1,812 डॉलर होता. चांदीचा भाव प्रति औंस 26.02 डॉलरवर स्थिर झाला.एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरच्या दुर्बलतेमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मजबुती पाहायला मिळाली आहे.

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात 190 रुपयांची वाढ दिसून आली राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 48,080 रुपये झाली आहे. गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 47,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 46,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.. पण चांदी प्रती किलो 200 रुपयांनी घसरली आहे. गेल्या सत्रात चांदीचा दर प्रति किलो 69,400 होता. तो आता वाढून 69,200 प्रति किलो झाला आहे.

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर

मुंबई ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०
पुणे ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०
जळगाव ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०
कोल्हापूर ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०
लातूर ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०
सांगली ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०
बारामती ४८ हजार ०८० ४७ हजार ८९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर
मुंबई ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०
पुणे ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०
जळगाव ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०
कोल्हापूर ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०
लातूर ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०
सांगली ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०
बारामती ४७ हजार ०८० ४६ हजार ८९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर

मुंबई ६९ हजार २०० ६९ हजार ४००
पुणे ६९ हजार २०० ६९ हजार ४००
जळगाव ६९ हजार २०० ६९ हजार ४००
कोल्हापूर ६९ हजार २०० ६९ हजार ४००
लातूर ६९ हजार २०० ६९ हजार ४००
सांगली ६९ हजार २०० ६९ हजार ४००
बारामती ६९ हजार २०० ६९ हजार ४००

ग्लोबल न्युज नेटवर्क: