सोन्याच्या दरात घसरण सुरूच: वाचा किती आहेत दर

ग्लोबल न्यूज : गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. या महिन्याभरात सोन्याच्या दरात 1800 रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात 760 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.

परिणामी 24 कॅरेट सोन्याचा दर 44000 रुपये इतका झाला आहे. गोल्ड रिर्टन या वेबसाईटच्या माहितीनुसार शनिवारी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 44,000 रुपयांपर्यंत पोहचला असून 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 43,000 रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे.

तर दिल्ली शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 48,050 रुपये आहे तर 22 कॅरेट सोने 44,050 रुपयांवर पोहचले आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा दर 46,170 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 42,320 रुपयांवर पोहचला आहे. तर कोलकोतामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 46,900 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,180 रुपये झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: