सोन्याच्या दरात घसरण सुरूच : 12000 रुपयांपर्यंत घट, आणखी किती खाली येणार भाव, जाणून घ्या तज्ञांचे मत

सराफी बाजारांमध्ये  सोन्याची  पडती किंमत  आणि चांदीचे  खाली येणारे भाव हे एप्रिलमध्ये  चालू होणाऱ्या लग्नसराईसाठी  चांगले आहेत. ज्या लग्नघरांमध्ये सोन्याचांदीचे दागिने  खरेदी करायचे आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. 24 कॅरेट सोने आपल्या आत्तापर्यंतच्या 56254 रुपयांच्या सर्वोच्च स्थानावर  आहे. ही किंमत 12000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी खाली आली आहे आणि यानंतरही ही किंमत घसरण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते येत्या दिवसांत ही किंमत 42500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

12000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने, आणखी किती खाली येणार भाव, जाणून घ्या तज्ञांचे मत

यावर्षी 5870 रुपयांपर्यंत झाले स्वस्त सोने

गेल्या आठवड्यात सोन्याचा हजेरी भाव फक्त 183 रुपयांनी कमी झाला आहे, पण या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये 24 कॅरेटचे सोने 2238 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या 30 वर्षात सर्वात वाईट सुरुवात करणाऱ्या सोन्याची किंमत अद्यापही पडतेच आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत ही किंम 5870 रुपयांनी खाली आली आहे. चांदी गेल्या आठवड्याच्या तुलनेत 713 रुपये प्रति किलोग्रॅमने वर चढली आहे. मात्र गेल्यावर्षीच्या आपल्या सर्वोच्च किंमतीच्या तुलनेत 10167 रुपयांनी स्वस्तही झाली आहे.

यापुढे इतकी असू शकते किंमत

केडिया कमोडिटीजचे डायरेक्टर अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दिवसांमध्ये स्थानिक बाजारात सोने 42500 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकते. यामुळे लोअर लेबलवर सोन्याची खरेदी वाढत आहे. जर यामुळे सोन्याच्या दरात उचल आली तर हा भाव 46500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. सोन्याच्या किंमतीत फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक घट झाली आहे. सराफी बाजारांत सोन्याच्या किंमतीत 3000 रुपये घट झाली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: