सोन्याचे दर उतरले, चांदीच्या दरानेही दिला ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या आजचे दर

सोन्याचे दर उतरले, चांदीच्या दरानेही दिला ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या आजचे दर

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र, नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात वाढ पाहावयास मिळाली होती. आज सोन्याचे थोडे कमी झाले. मुंबईमध्येही सोन्याचा भाव आज शनिवारी (दि. 16 जुलै) कालच्या तुलनेत कमी होता. काल (शुक्रवारी) मुंबईत 10 सोन्याचा दर 51160 इतका होता, तर आज (शनिवारी) तो कमी होऊन 50,730 रुपये इतका आहे. ( Gold Silver price Updates )

मुंबई – आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी 46,500 रूपये तर २४ कॅरेटसाठी 50,730 रूपये आहे. चांदीचे दर आज 50 रुपयांनी कमी झाले. (Gold, Silver price Updates). मुंबईत आज चांदीचे दर १० ग्रॅमला 550 रूपये इतके आहेत.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 50580 रुपये

दिल्ली – 50730 रुपये

हैदराबाद – 50730 रुपये

कोलकत्ता – 50730 रुपये

लखनऊ – 50890 रुपये

मुंबई – 50,730 रुपये

नागपूर – 50,760 रुपये

पुणे – 50,760 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 62400 रुपये

दिल्ली – 55000 रुपये

हैदराबाद – 60400 रुपये

कोलकत्ता – 55000 रुपये

लखनऊ – 55000 रुपये

मुंबई – 55000 रुपये

नागपूर – 55000 रुपये

पुणे – 55000 रुपये

१८ कॅरेट सोनेही वापरतात – सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: