सोन्याच्या दरात वाढ, चांदीतही तेजी, जाणून घ्या संध्याकाळचा भाव 

नवी दिल्ली :  स्थानिक बाजारात  सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी  सोन्याचा भाव 185 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे. या वाढीमुळे सोन्याचा भाव 49,757 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 49,572 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला होता.

सोने महागले, चांदीतही तेजी, जाणून घ्या संध्याकाळचा भाव

चांदीच्या भावात सोमवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली.   चांदीमध्ये 1,322  रुपयांची वाढ झाली. या घटीमुळे चांदीची किंमत 68,156 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.  गेल्या सत्रात चांदी 66,834  रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

सिक्युरिटीनुसार जागतिक स्तरावर सोने-चांदीचे मूल्य वाढीमुळे भारतीय बाजारात मौल्यवान धातूची किंमतीवर परिणाम झाला.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा हाजीर भावात सोमवारी सोन्याचा भाव 185 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तराबाबत बोलायचे झाले तर सोन्याचा वैश्विक भाव मंगळवारी 1,885 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसत होता.  चांदीची वैश्विक किंमत 26.32 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की,  डॉलरच्या मूल्यात घटमुळे सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळाली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्टेने संदर्भात चिंता आणि लॉकडाऊन संदर्भात अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

महाराष्ट्रात सोने स्वस्त, चांदीत घसरण

सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 480 रुपयांनी वाढ झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,210 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 49,210  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 49,730 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर  48,730रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात वाढ झाली असून महाराष्ट्रात चांदीच्या दरात  1300 रुपयांची वाढ झाली आहे. काल 67,600  वर असलेली चांदी आजही 68,900 रुपयांवर विकली जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: