सोने झाले स्वस्त; जाणून घ्या, आजचे दर…

शेअर बाजारात सध्या घरसण सुरू आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील चढ-उताराचा परिणाम सोन्याचांदीच्या किंमतीवर होत आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोने आता स्वस्त झाले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या चांदीच्या दरात चढ उतार होत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस 24 कॅरेट सोन्याचे दर 51,125 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. ते जूनच्या पहिल्याच दिवशी 50,606 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. तसेच 3 जूनला सोन्याच्या दरात वाढ होत ते 51,455 रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरणीला सुरुवात झाली. 10 जूनपर्यंत दर 51 हजाराच्या खाली आले होते. त्यावेळी सोने 50,935 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

13 जूनला सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली. त्यावेळी सोन्याचे दर 51,435 पर्यंत पोहचले होते. शेअर बाजारात 14 जूनला मोठी घसरण झाल्याने सोन्याचे दर 50,647 रुपयांवर आले होते. या एकाच दिवसात सोन्याचे दर 212 रुपयांनी घरसले होते. सोन्याचे दर घसरले असल्याने सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: