मुलगी बेपत्ता असल्याची मंत्र्यांची तक्रार; तर त्याच मुलीची पोलिस संरक्षण देण्याची मागणी

 

तामिळनाडूमधील एका मंत्र्यांच्या मुलीने एका व्यापाऱ्यासोबत कर्नाटकमध्ये पळून जाऊन लग्न केले आहे. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाम्पत्याने बंगळुरू पोलिस आयुक्तांकडे केली आहे. सदर मंत्र्याने तामिळनाडूच्या मंत्र्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.

तामिळनाडूच्या एका मंत्र्यांच्या नवविवाहित मुलीने एका व्यापाऱ्यासोबत पळून गेल्यानंतर बंगळुरूमध्ये पोलिसांकडून संरक्षण मागितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तामिळनाडूचे मंत्री पी. के. शेखर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने बंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त कमल पंत यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

जनकल्याणी हिने पत्रकारांना सांगितले की, तिने सतीश कुमार यांच्याशी लग्न केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. तिला आणि तिच्या पतीच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली. लग्नासाठी दांपत्याला मदत करणाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाने हिंदू धर्माच्या रीतीने कर्नाटकच्या रायचूर शहरातील हलस्वामी मठात लग्न केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री पी. के. शेखर बाबू यांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती.

Team Global News Marathi: