परांडा शहरालगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांची मोकाट जनावरे करतात वारंवार नासधूस: नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

परंडा – शहारा लगत च्या शेतात शहरातील मोकाट जनावरे घुसून पिंकांची नासधूस वारंवार करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी परंडा तहसिलदार व मुख्याधिकारी यांना गुरुवार ( दि. २० ) दिलेल्या निवेदनात केली आहे .

मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा उपोषण करण्यात येईल . असेही निवेदनात म्हटले आहे .
महादेव मेहेर, रईस मुजावर, जाकीर मुजावर, इरफान मुजावर, मुस्ताक पल्ला, पांडू खताळ,नुरू६ीन मुजावर, निजाम मुजावर, ज्ञानेश्र्वर खताळ आदि शेतकऱ्यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे .

नगर परिषदकडे कोंडावडाच नाही , नपचे अक्षम्य दुर्लक्ष,
मोकाट जनावरांच्या पालकाला अभय – परंडा नगर परिषदेकडे कोंडावडाच नाही .

त्यामुळे मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे . शेत पीकांची नासाडी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मोकाट जनावरं करीत आहेत . तसेच बाजारपेठ, रोड, चौक, बसस्थानक आदि ठिकाणी यांचा वावर असल्याने नागरिकांना तसेच व्यापारी, भाजी, फळे विक्रते यांना त्रास सहन करावा लागत आहे .

नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे . शेतकऱ्यांना रात्रंदिवस राखण करावी लागत आहे . मोकाट जनावरे शेतकऱ्यांनी पकडून बांधून ठेवली तर हे लोक दमदाटी करून सोडवून नेतात . नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे यांची मुजोरी व मनगटशाही वाढली आहे . संबंधीत अधिकारीही त्यांना पोसत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: