ऐन दिवाळीत सीमेवर पाकड्यांचा भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांसह चार जवानांना वीरमरण

देशभरात दिवाळीचा सण साजरा होत असताना जम्मू-काश्मिरात सीमेवर चार जवानांना हौतात्म्य आले. गुरेज ते उरी सेक्टर दरम्यान सातत्याने पाकडय़ांकडून शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करीत गोळीबार सुरू आहे. यावेळी धुमश्चक्रीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र कोल्हापूर जिल्हय़ातील ऋषीकेश जोंधळे आणि नागपूरचे भुषण सतई यांच्यासह चार जवान शहीद झाले आहेत. पाकडय़ांच्या गोळीबारात सीमेलगतच्या गावातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले असून, पाकिस्तानचे किमान आठ सैनिक ठार झाले आहेत. पाकडय़ांचे बंकर्स आणि दहशतवादी लाँच पॅड्स उद्ध्वस्त करीत मोठे नुकसान केले आहे.

सीमेवरील गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान केरन, नौगाम येथे पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरू आहे. सीमेलगतच्या गावांना टार्गेट केले जात असून, तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. पाकडय़ांच्या हल्ल्याला हिंदुस्थानी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. केरन, उरी, नौगाम सेक्टरमध्ये धुमश्चक्रीत हिंदुस्थानी लष्कराचे जवान ऋषीकेश जोंधळे आणि भुषण सतई यांच्यासह तीन जवान शहीद झाले. हाजीपीर सेक्टरमध्ये ‘बीएसएफ’चे उपनिरीक्षक राकेश डोवाल (वय 39) हे शहीद झाले असून, एक जवान जखमी आहे. पाकड्यांच्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सीमेवरील नागरिकांना हालविले; हायअलर्ट
हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करून रक्तपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यासाठीच पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरू आहे. मात्र, पाकडय़ांचा हा डाव उधळून टाकण्यासाठी हिंदुस्थानचे जवान सज्ज आहेत. सीमेवर गस्ती वाढविण्यात आल्या असून, हायअलर्ट जारी केला आहे. सीमेलगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे.

घुसखोरीचा डाव उधळला; किमान 8 पाक सैनिक ठार
शुक्रवारी सकाळी केरन सेक्टरमध्ये संशयित हालचाली टिपण्यात आल्या. पाकिस्तानी सैन्याकडून दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा डाव होता. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हा डाव उधळून लावला. त्यानंतर पाकडय़ांनी गुरेज ते उरी सेक्टर दरम्यान शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरू केले. हिंदुस्थानी जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकडय़ांना धडा शिकविला. पाकिस्तानचे किमान 7 ते 8 सैनिक ठार झाले आहे. पाक सैन्याचे बंकर्स आणि दहशतवाद्यांचे लाँचपॅड्सही उद्धवस्त झाले.

नागपुरात शोककळा

नागपूर जिल्हय़ातील काटोल येथील फैलपूरचे भूषण रमेश सतई (वय 28) यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली. 9 वर्षांपूर्वी शहीद भूषण सतई हिंदुस्थानी लष्करात दाखल झाले होते. जम्मु-कश्मिरात गुरेज आणि बांधीपोरा सेक्टरमध्ये कार्यरत होते. अत्यंत गरीब पुटुंबातील शहीद भुषण यांचे आई-वडिल मजुरीचे काम करतात. त्यांना एक बहिण आणि एक लहान भाऊ आहे. संपूर्ण काटोल परिसरात शोक व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्हय़ात शोककळा

पाकडय़ांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्हय़ातील जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (20) हे शहीद झाले. जोंधळे पुटुंबियांचा एपुलता एक सुपुत्र आणि महाराष्ट्राचा वीर जवान शहीद झाला. यामुळे आजरा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान ऋषीकेश 2018 मध्ये लष्कराच्या 6 मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण घेतले होते. जम्मू-काश्मिरात शहीद जवान ऋषीकेश यांची पहिलीच पोस्टींग होती. जुनमध्ये ते आपली सुट्टी संपवून जम्मू-काश्मिरात हजर झाले हेते. त्यांच्या पश्चात आई, वडिल आणि एक लहान बहीण आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: