सरळ सेवा भरतीसाठी राज्य सरकारकडून चार कंपन्यांनी निवड – सतेज पाटील

सरळ सेवा भरतीसाठी राज्य सरकारकडून चार कंपन्यांनी निवड – सतेज पाटील

ग्लोबल न्यूज: गट ब आणि गट क मधील रिक्त पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या ‘महापोर्टल’ प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. याच सोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेत, महाविकासआघाडी सरकारने तात्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारनं सरळसेवा भरतीसाठी चार कंपन्यांनची निवड केली आहे.” अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलताना सतेज पाटील यांनी सांगितले की, “महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करुन सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती.

त्या विभागानं निवड करुन सादर केलेल्या माहितीनुसार चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार अँपटेक लिमिटेड, जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्र. लि., जींजर वेब्ज प्रा. लि. व मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसीच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.” अशी माहिती पाटील यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: