सहा महिन्यात पहिल्यांदाच कांद्याचे दर प्रतिक्विंटल २ हजारांपर्यत

ग्लोबल न्यूज : नाशिकच्या  होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे भाव सध्या २ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलवर गेले आहेत. गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच कांद्याचे दर १ हजार २०० ते २ हजार १०० च्या दरम्यान आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर १ हजार ७५० रुपयांवर स्थिर आहेत. या आठवड्यात गणेशोत्सवामुळे मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. मागणी आणि आवक यात तफावत राहाण्याची शक्यता असल्याने दर स्थिर राहाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

2) इतर देशांतून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मागणीमुळे भारतातून होणारी मसाल्यांची निर्यात वाढली आहे. २०१९-२० मध्ये भारताने ११ लाख ८३ हजार टन मसाल्याच्या पदार्थांची निर्यात केली आहे. ही निर्यात २१ हजार ५१५ कोटी रुपये मूल्याची होती. २०१९-२० मध्ये भारताने २२५ मसाल्याच्या पदार्थांची निर्यात केली आहे. २०१८-१९ मध्ये हा आकडा २१९ इतका होता. भारतातून १८५ देशांना मसाल्यांची निर्यात होत असते.

शुभ वार्ता: कोरोनाची पहिली लस टोचली पुण्यात, दुसरा डोस २८ दिवसांनी

3) देशांतर्गत मागणी भागविण्यासाठी भारतात दरवर्षी सुमारे १४-१५ दशलक्ष टन खाद्यतेल आयात केले जाते. यामुळे तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने संशोधन व विकासासाठी आणि तेलबियांच्या विविध जातींच्या सुधारित बियाण्यांसाठी अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी Solvent Extractors Association of India ने सरकारकडे केली आहे. याशिवाय केवळ कच्च्या पाम तेलाच्या आयातीस परवानगी देऊन इतर सर्व शुद्ध तेल प्रतिबंधित प्रवर्गातच ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बाळराजे पाटील अनगरकर बार्शीच्या राजकारणात एंट्री करणार का? चर्चाना उधाण; वाचा सविस्तर-

पुण्यातील ‘या’ कार्यक्रमासाठी पवार- फडणवीस बऱ्याच दिवसांनी एकाच व्यासपीठावर येणार

शेतीवर आलेल्या कोरोना संकटावर मात करणारी स्त्री-योद्धा

ग्लोबल न्युज नेटवर्क: